तुला पहाते रे.....!
तुला पहाते रे.....!
बागेतील फूल झाडात
तुला पाहते रे
उमलणाऱ्या कळ्यांमध्ये
मी तुला पाहते रे......!
माझ्या प्रेमळ हृदयात
मी तुला जपते रे
माझ्या सोज्वळ मनात
तुला पाहते रे......!
माझ्या प्रत्येक कवितेत
मी तुला सजविते रे
या काव्यफुलांना न्याहाळताना
मी तुला पाहते रे......!
उडणाऱ्या पाखरांच्या थव्यात
मी तुला पाहते रे
मोकळ्या रानोमाळात विसावताना
"मार्शल" तुला पाहते रे.......!

