STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

तुला माझी शपथ

तुला माझी शपथ

1 min
290

लावू नको आरोप माझ्यावर तुला माझी शपथ

 शिक्षा नको निर्दोष असल्यावर तुला माझी शपथ


 देहात होता प्राण तेव्हा गारवा नाही कुठे 

ढाळू नको अश्रुंस मरणावर तुला माझी शपथ


 बदलून गेली माणसे काळाप्रमाणे कालची

पाजू नको जल बर्फ बनल्यावर तुला माझी शपथ


 गोठून गेल्या भावना माझ्या कशा थंडी विना

 हसवू नको आत्ताच रडल्यावर तुला माझी शपथ


 दीपक नसे छोटा कधीही भास्करापेक्षा सखी 

पेटव दिवा काळोख झाल्यावर तुला माझी शपथ



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy