STORYMIRROR

Umesh Salunke

Romance

3  

Umesh Salunke

Romance

तुला भेटायचा झाला एकच ठिकाणा

तुला भेटायचा झाला एकच ठिकाणा

1 min
256

तुला भेटायचा झाला एकच ठिकाणा

 मला सुद्धा तुला पाहिल्या बिगर घरी

 जाऊ वाटेना.....!


 किती दिवस झाले तू बोलली नाही

 किती दिवस झाले तू कॉलेजला आली नाही

  किती दिवस झाले दोघे फिरायला गेलो नाही

  किती दिवस झाले हॉटेलमध्ये गेलो नाही......!


  अरे तू मला घेऊन जायचं म्हणतो

   अरे तू माझ्या घरापासून यायला घाबरतो

    अरे तू माझ्यासाठी खर्च करायला विचार करतो

    अरे तू प्रेमाच्या नावाखाली मित्रांना सगळी बिलं

     दाखवून देतो की खरंच प्रेम करतो का किंमत

      सांगतो......!   


    तुला भेटायचा झाला एकच ठिकाणा

     तुला खूप सांगण्यासारखं असतं तू

     लवकर काय येत नाही ना मला

     सावलीसुद्धा तुझी दिसेना.......!


     नको नको करून तू सोडतो मला

     तुझं प्रेम म्हणायचं का टाईमपास

     तुझ्या अशा विचित्र वागण्यामुळे

     कला शाखेत पुन्हा एकदा बसेल असं

     वाटत आहे ना आता मला......


 तुला भेटायचा झाला एकच ठिकाणा

  तुझ्या सासऱ्याला कुणीतरी सांगितलं ना

  उद्या सकाळी तू त्या जागेवर आला ना

  की तुला नापास झाल्याचा महाप्रसाद मिळेल ना

   आयुष्यभर तुझ्या नावाची चर्चा सगळीकडे

    होईल ना.....!


    खरंच जबरदस्ती पडली महागात

    मित्र सांगत होते नको पडू त्या फंदात

    आता आले ना हात-पाय गळ्यात

    आला ना आमच्या मैत्रीच्या कट्ट्यात......!


तुला भेटायचा झाला एकच ठिकाणा

घरी काय झालं हे सांगण्यासाठी शब्दच फुटेना

शेवटी तुला मिळवण्याचा नाद

 अजूनही सुटेना.....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance