STORYMIRROR

Pandit Warade

Romance

3  

Pandit Warade

Romance

तुझ्यात मन गुंतले

तुझ्यात मन गुंतले

1 min
390

सांगू कसे साजणी, कामिनी, माझ्या शकुंतले

गुरफटलो प्रेमात तुझ्या मी तुझ्यात मन गुंतले


लोक वदती असा कसा हा खुळ्यागत वागतो

झोप येईना डोळ्यात माझ्या रात्र रात्र जागतो


लक्ष मुळी कामात लागेना, इतुकी ती सतावते 

अस्वस्थ, बेचैन होतो अशी तुझी आठवण येते


काय करू दिनरात तुझा गं ध्यास मना लागला

भेट तुझी होताच बिघडलो होतो किती चांगला


कशी विसरलो तहान भूकही, माझे मला कळेना

कुठेतरी चूक होते मोठी, मज कळते परी वळेना


मूर्ती दिसे सर्वत्र तुझीच अन भांबावतो स्वतःशी

गोंधळ उडतो मनात माझ्या संवाद ना कुणाशी


रंभा, उर्वशी, नको मेनका, बरी हीच शकुंतला

दुष्यन्तासम कधी न दिसतो तरीही जीव गुंतला


भोळे भाबडे बिचारे माझे मन तुझ्यात गुंतले

आहे तसा पदरात मला घे, माझ्याच शकुंतले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance