तुझ्याचसाठी प्रिये...
तुझ्याचसाठी प्रिये...
दिसता त्या आडोश्याला तु क्षण सुंदर जाहला ,
तुझ्याचसाठी प्रिये माझ्यात मी मनाने गंधर्वं पाहला ...
नाजूक हातात अदेने घेत साजूक तुपाची फळी ,
तुझ्याचसाठी प्रिये माझ्या मनाचा जीव आटला...
लक्षवेधी लहंग्याला चमचमणाऱ्या त्या तारंका,
तुझ्याचसाठी प्रिये माझ्या मनाचा चंद्र मातला ...
रेशमी लटेची कुरळी समोर आलेली बट जिव्हारी,
तुझ्याचसाठी प्रिये वाऱ्यापरी मनाची हुरहूर साहला...
ती सूर्याला ग्रहण लावणारी झलक तुझी कातील ,
तुझ्याचसाठी प्रिये मी तूळसपत्रपरी गेलो वाटला...
दिसता त्या आडोश्याला तु क्षण सुंदर जाहला ,
तुझ्याचसाठी प्रिये माझ्यात मी मनाने गंधर्वं पाहला ...