STORYMIRROR

Gajanan Pote

Romance

3  

Gajanan Pote

Romance

।।तुझ्या सहवासाने।।

।।तुझ्या सहवासाने।।

1 min
383

सखे तुझ्या नजरेचा बाण मनी उतरला 

तुझ्या स्मित हसण्याने प्रेमरंग बरसला।।


जसा आकाशी तसा जीवनी इंद्रधनू अवतरला 

कोमेजलेल्या सुमनांना नवचैतन्याचा स्पर्श लाभला।।


सये तुझ्या आणि माझ्यातला प्रेमभाव जागला 

प्रेमाचा गारवा आज पसरला तुला बघताच जीव माझा सुखावला।।


जसा अंधाऱ्या रात्री काजवा चमकला 

तसा तुझ्या स्पर्शाने माझ्या अंतरीचा गाव सजला।।


सखे आज तुझ्या आगमनाने माझ्या अंगणातील चाफा बहरला

हिरमुसलेला पारवा आज आकाशी उडाला 

तुझ्या सहवासाने आज माझ्यातला मी मला दिसला।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance