.... "तुझ्या शहरात आताशी"
.... "तुझ्या शहरात आताशी"
तुझ्या शहरात आताशी अशांती माजली आहे
परंतू त्या जुण्या गावी तशी पण सावली आहे..
कधी तू जाणती होते कधी तू संशयी दिसते
तुला नव्हती तरी माझी पर्वा तू आपली आहे..
दिसेना का कुठे आता भला माणूस आयुष्या
नवी दुनिया नव्या रंगात सारी पाटली आहे..
इथे नाही कधी दंगल, रस्त्यावरती झळकली पण
कळेना आज कोणी आग कुठली लावली आहे..
सुगावा लागला नसला असूया कारणाचा पण
तुला सांगू तुझी दुःखे, अकारण थांबली आहे..
उसास्यावर उसासा टाकतो बेभान वार्यासम
व्यथांवरती जुनी बोली करारी गाजली आहे
कधी वारा कधी पाणी कधी ती तारका भासे
व्यथा प्रेमात भरली अन् गझल पण साधली आहे...
नसे कोणी जगा माझे तरीही भेटती दुःखे
धरूनी वाट काशीची, इथे मी हारली आहे....

