तुझ्या साठी
तुझ्या साठी
नेसली होती हिरवी साडी,
किती छान वाटत होती.
झुक झुक गाडी येऊन गेली,
तरी सुद्धा घाई न केली.
माहित होते सुट्टी आहे,
तरी सुद्धा सीट नाही.
पटकन पटकन आफिसला आली,
काम आटोपले, संध्याकाळ झाली.
लहान झाले सूर्याचे किरण,
आकाशात होता पानेरी रंग,
तरी सुद्धा छान वाटत होता,
तुझावर तो हिरवा रंग.
