STORYMIRROR

Supriya Devkar

Romance

3  

Supriya Devkar

Romance

तुझ्या रंगात रंगले मी

तुझ्या रंगात रंगले मी

1 min
414

मी अवखळ वेडी राधा

साद घाली रे कन्हैय्या 

तुझ्या प्रेमाची रे भुकेली

आले रे प्रेमदान घ्यावया


तुझ्या रंगात रंगले मी

प्रितीत तुझ्या दंगले मी

पडला विसर जगाचा मजला 

सण हा तुझ्या रंगात सजला


विविध रंगांची ही किमया 

झाले सप्तरंगी आकाश 

पडला दाही दिशांना 

तुझ्या प्रेमाचा प्रकाश 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance