तुझ्या प्रेमात...
तुझ्या प्रेमात...
डोकावतोय आज पुन्हा, गतच्या माझ्या आयुष्यात
माझ्या हृदयावरच्या तुझ्या, गडद आठवणींच्या विश्वात
पुन्हा वाटलं आठवावं, तिच्या लोभस रूपाला
मग वाटलं का त्रास द्यावा, आपल्या कोमल मनाला
माहीत होते शब्द, अपुरे पडतील लिहिताना
अंतहीन सुरुवात झाली होती, तिला वर्णिताना
अप्सरेपरी कांती तिची, अन् ते निर्मळ हास्य
तोलताना समोर तुझ्या, लाजेल कांस्य
विसर पडला वास्तवाचा, आठवणींच्या या जगात
वाटते की पुन्हा एकदा, पडावे तुझ्या प्रेमात

