STORYMIRROR

Sushama Gangulwar

Romance

3  

Sushama Gangulwar

Romance

तुझ्या माझ्या प्रेमाचा काळ

तुझ्या माझ्या प्रेमाचा काळ

1 min
203

तुझ्या माझ्या प्रेमाचा 

काळ किती न्यारा होता 

वही कागदावरच्या लेखणीचा 

भार किती प्यारा होता 


आपल love म्हनजे ना 

watsup ना फ़ेसबुक 

फक्त लाल निळी पेन 

आणि सिंगल लाईन नोटबुक 


तुझ्या माझ्या प्रेमात ना 

फोन ना दूरध्वनी केंद्र 

आपले मित्रच होते की 

आपले आकाशवाणी केंद्र 


ना तु पाठवली इमेज 

ना मी गेलो कधी थेटरात 

माझ्या मनातल सार मी 

तुला लिहत होतो लेटरात 


आपल प्रेम सिध्द करन्यास 

ना कॉपी होते ना पेस्ट 

आपली स्वरचित रचनाच 

होती आपली प्रामाणिक टेस्ट 


तुझ्या माझ्या काळात 

विडिओ होता ना ऑडिओ 

आपले कंठच होते दोघांचे 

अप्रतिम सिंगिंग रेडिओ 


हातात हात घालून फिरायला 

ना टू व्हिलर ना फोर व्हिलर 

समुद्र किनारी बसून पहायचो

प्रत्येकाच्या प्रेमाचे ट्रेलर 


फिरायला गेलो कुठे तरी 

ना काढायचो सेल्फी ना पीक्स 

आपल्या -हदयातच साठवायचो

आपले अस्मरणीय क्लिकस


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance