STORYMIRROR

Neha Khedkar

Fantasy

3  

Neha Khedkar

Fantasy

तुझ्या आठवणीच कारण

तुझ्या आठवणीच कारण

1 min
243

जसे अतूट नाते तुझे नी माझे

तसेच ह्या पाऊस आणि छत्रीचे

पाऊस जसा गरजतो आणि मंदावतो 

छत्री सोबतीला असू दे, म्हणून तो आवर्जून सांगतो...


कातरवेळचा मंद वारा

तुझ्या स्मृतींना जागे करतो

काळोख दाटून मेघ सरकत

पावसाला अलगत जागा देतो...


पाऊस वेडा हा आठवणीचा

तुझ्याच वाटेत येऊन पडतो

नजरभेटीसाठी आतुरलेला तो

थेंब अन थेंब तरसतो...


बरसणाऱ्या पावसात बघून 

मनात प्रश्न पडतो

माझ्यासारखं कोण अजून

ह्या पावसात रडतो...?


पावसाला उधाण आलं की

सारं सारं काही बदलतं

शब्दांचे यमक जुळून

तुझ्या आठवणीच कारण बनतं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy