STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Tragedy

3  

Kalpana Nimbokar

Tragedy

तुझ्या आठवणी

तुझ्या आठवणी

1 min
310

तुझ्या आठवणी

मागतात मला गडबडीतले

उसणे क्षण

तू माझ्या जवळ असतानाचे

होत असलेले भास अन् भ्रम


एकांताच्या काठावर

उसळतात तुझ्या आठवणी..

व्याकुळ अतिशय

करतात तुझ्या आठवणी....


तुझ्या आठवणी येतात

मनाच्या अंगणात हसतात बहरतात, मला चिडवतात

तुझ्या आठवणी

अंतर्बाह्य मला तरसवतात

तुझ्या आठवणी....


घेऊन जातात मला माळरानी

जिथे असतो आपण 

भेटलेलो कधी काळी.....

जाळतात तुझ्या आठवणी..

गाभार्‍यात जीवनाच्या

फिरतात तुझ्या आठवणी


वेध आयुष्याचा माझ्या

घेतात तुझ्या आठवणी

क्षणोक्षणी, जळीस्थळी

छळतात तुझ्या आठवणी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy