तुझ्या आठवणी खोडताना
तुझ्या आठवणी खोडताना
विखुरलेल्या स्वप्नांना जोडताना
तुझ्या आठवणी खोडताना
खूप त्रास व्हायचा...
मग असाच जगायचो
अन जिवंतपणी मरायचो
तू दिलेल्या जखमांवर मीठ चोळत
कारण सवयच झाली होती
हृदयांन ठरवलं होतं
काही ही झालं तरी
पुन्हा प्रेम नाही करायचं
केलेल्या चुकांवर पांघरून घालायचं
आता पक्क ठरवलं
पहिलं सारं विसरायचं
पण तेव्हा अस काही व्हायचं..
विखुरलेल्या स्वप्नांना जोडतांना
तुझ्या आठवणी खोडतांना
खूप त्रास व्हायचा.....
जवळ नसायचं कोणी
मग डोळ्यात यायचं पाणी
काळजाला ओरखडे घेत
हातांना चटके देत
शिक्षा द्यायचो
तुझ्या शरीराला स्पर्श केलेल्या
माझ्या या हलकट चामडीला
कारण त्यानं पुढाकार नसता घेतला तर
एव्हड सारं झालंच नसतं
आज माझ्या स्वप्नाचं घर दुसरंच असतं
आता पक्क ठरवलं
पहिलं सारं विसरायचं
पण तेव्हा अस काही व्हायचं...
विखुरलेल्या स्वप्नांना जोडताना
तुझ्या आठवणी खोडताना
खूप त्रास व्हायचा....
p>
बघ तू ही किती मतलबी निघालीस
तुझ्या ओठांनी केलेला स्पर्श विसरलीस
कधी कधी ओठ ही छाटून टाकावे वाटतात
जेव्हा शंकाच शंका मनात दाटतात
पण शब्दांनी तुझी जागा घेतली होती
आज विरहाची आग मनात पेटली होती
तू जवळ नसल्याचं भान व्हायचं
दुःखाच आभाळ डोक्यावर घोंगायच
आता पक्क ठरवलं
पहिलं सारं विसरायचं
पण तेव्हा असं काही व्हायचं...
विखुरलेल्या स्वप्नांना जोडताना
तुझ्या आठवणी खोडताना
खूप त्रास व्हायचा......
तू गेल्या पासून
साधी झोप ही नाही
अन डोक्यावर आता
राजाचा तो टोप ही नाही
राजा सारखा रहायचो
मनासारखा वागायचो
तू मला बदललं होतंस
का बदललं ते पण माहीत व्हतं
तुझं माझ्यावर असणार प्रेम अपार व्हतं
जगण्यासारखं काहीच उरलं नव्हतं
म्हणून देवाला मरण मागितली व्हतं
आता पक्क ठरवलं
आता सारं विसरायचं
पण तेव्हा असं काही व्हायचं...
विखुरलेल्या स्वप्नांना जोडताना
तुझ्या आठवणी खोडताना
खूप त्रास व्हायचा...