...तुझसाठी
...तुझसाठी
सांग ना खरंच,तुला
समजावून सांगू कशी..
तू समजतोस,मला,
मी नाही रे तशी..
इतक तुझ्यावर,
प्रेम करावं..
जगाची पर्वा न करता,
दिनरात तुझ्यासाठी झुरावं..
तु नसतांना,कितीदा
तुला आठवाव..
तुला न सांगता,
मनातलं मनातच साठवाव..
डोळ्यांच्या कडा सतत,
तुझ्यासाठी पाणवलेल्या असतात..
तू नसतोस आसवे पुसण्यास,
मग, हलकेच हात डोळे पुसतात..

