तुझं तारुण्य
तुझं तारुण्य
तुझं तारुण्य मनस्वी अन चितचोर
तुझं जवळ येणं आणि मनाचा मोर
तुला बाहुपाशात बांधताना
माझं मला विसरणं आणि ग्रीष्मातल्या त्या
गुलमोहराचं गाणं,
तुझ्या केसांतून विहरणारा माझा श्वास
आणि तू घट्ट बिलगताना, चांदण्याचा आभास!
चुंबून घेताना तुझ्या देहावरच्या कळ्या,
माझ्या ओठांच्या लहरी किती उतावळ्या!

