तुझं असणं महत्त्वाचं
तुझं असणं महत्त्वाचं
आपण रोज बोललो नाही बोललो
तरी चालेल,
एकमेकांच्या सुख दुःखात एकत्र नसलो
तरी चालेल,
तुझं असणं महत्त्वाचं..
तू आनंदात आहेस कारण मी नसले
तरी चालेल,
तुझ्या आठवणीत मी नसले असले
तरी चालेल,
तुझं असणं महत्त्वाचं..
तुझा आवाज ऐकू नाही आला
तरी चालेल,
माझी कधी विचारपूस तू नाही केली
तरी चालेल,
तुझं असणं महत्त्वाचं...

