तुझी सावली व्हावं
तुझी सावली व्हावं
तुझ्यासोबत नेहमी चालण्यासाठी
कधीही तुझी साथ न सोडण्यासाठी
ध्येयाप्रत तुला पोहचवण्यासाठी
तुझी सावली व्हावं
गर्द उन्हात तुला सुखावण्यासाठी
प्रेमाची फुंकर घालण्यासाठी
सुखावून तुला प्रफुल्लित करण्यासाठी
तुझी सावली व्हावं
कोणी सोबत नसेल तरी सोबत देण्यासाठी
आयुष्याच्या वाटेवरती तुझ्यासाठी वाटाड्या होण्यासाठी
सदैव तुला योग्य मार्ग दाखवण्यासाठी
तुझी सावली व्हावं

