तुझी साथ
तुझी साथ


जीवनात तुझी साथ
किती छान वाटतं
कधी बेधुंद तर
कधी बेभान वाटतं
खुल्या आकाशाखालचं
मोकळं रान वाटतं
मनात प्रेमानं जपलेलं
पिंपळ पान वाटतं
हृदयाच्या स्पंदनात
जणू श्वास वाटतं
कठीण प्रसंगातही
तुझं विश्वास वाटतं
जीवनात तुझी साथ
किती छान वाटतं