STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Inspirational

4  

.प्रमोद घाटोळ

Inspirational

तुझे रुपेरी चांदणे.. ( गझल )

तुझे रुपेरी चांदणे.. ( गझल )

1 min
443

  तुझे रुपेरी चांदणे... ( गझल )


वृत्त.. अनलज्वाला ( २४ मात्रा )


तुझे रुपेरी चांदणे माझा प्राण आहे

दे होकार तू प्रेमाची मी खाण आहे १


कुठे घेवू उसासा पेटले रान आहे

भाजलेल्या काळजाची तुला आण आहे २


कोकीळही तू तुहीच माझे कान आहे

भरलास तू होकार मला अभिमान आहे ३


गोड हासणे तुझे गुलकंदी वाण आहे

नाजूक पापण्यांना तुझाच गुमान आहे ४


तुझ्या प्रभेमुळे उजेडाची शान आहे

तुझ्या स्वरांमुळे धराही बेभान आहे ५


जरा बांध कुंतलांना रात तुफाण आहे

भरजरी तारुण्याचा तुजला सन्मान आहे ६


किलबिलत्या पाखरांचे तू मुक्त गान आहे

तुझ्यामुळे प्रिये स्वरांनाही मान आहे ७


तुझ्या चिर तारुण्याचा मधुगंध ताण आहे

ओढती सुगंध माणसे जणू श्वान आहे ८


चाल गजगामिनीची तुला वरदान आहे

सखे तू मज भेटलेले अभयदान आहे ९


 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational