मृद्गंध पावसाचा
मृद्गंध पावसाचा
मृदगंध पावसाचा,
दरवळ भिजल्या मातीचा,
प्रयत्न असे बघा विधात्याचा,
निसर्ग प्रफुल्ल करण्याचा,
मृदगंधी त्या वातावरणात,
चैतन्याची अनोखी सळसळ,
वारे वाहती गंध घेऊनी,
चैतन्याचा साज लेवूनी,
पाण्याचे ते थेंब विसावती,
काळ्या आईच्या कुशीमधूनी,
गंधित दरवळ पसरे पहा,
ढेकळांच्या उशीमधूनी,
अनोखी साक्ष चेतनेची,
निसर्ग देई गंधामधुनी,
अन्यथा भेगाळून जाईल धरणी सारी,
पाण्याच्या एका थेंबावाचुनी
