पावसाची सर
पावसाची सर
पावसाच्या सरी अशा
लहरून पडू लागल्या की,
अचानक मी माझे डोळे मिटून घेतले..
त्या सरींचा प्रत्येक थेंब
डोळ्यांच्या पापण्यांपासून ओठांपर्यंत,
असा विरघळला की, असं वाटलं,
जणू काही नभातल्या सरींनी
माझ्या कवेत विसावाच घेतलाय..
बघता बघता अवतीभवती
सारं काही भिजलं,
मातीचा गंधही चोहीकडे पसरला..
तरीही मी अवखळ वेडी
तिथेच उभी होती,
पूर्णपणे चिंब भिजलेली..
ते सारं दृश्य न्याहाळत..
