ओवी... लेखणी माझी
ओवी... लेखणी माझी
लेखणी तू देखणी गे
सोज्वळ दिसे रुपडे
ठाव घेई मनाचा गे
प्रसव ऐसी अक्षरे ||धृ||
सासर माहेर गोविले
ऋणानुबंध जोडीले
अभंग नाते गाईले
प्रसव ऐसी अक्षरे||१||
नाते प्रेम समजण्या
जात धर्म मोडण्या
दोन हात अन्याया
प्रसव ऐसी अक्षरे||२||
गुंडागर्दी माजली
सभ्यता कुस्करली
शहाणपण दाखवी
प्रसव ऐसी अक्षरे ||३||
भास आणि आभास
वास्तव फक्त सहवास
अंतर दावी मम खास
प्रसव ऐसी अक्षरे ||४||
भूमिपुत्र राबतो
जवान धरणी रक्षितो
जाण तयाची राखितो
प्रसव ऐसी अक्षरे||५||
