तुझ माझं मायेचं नातं
तुझ माझं मायेचं नातं
तुझं माझं मायेचं नातं
का गेलीस आई तू सोडून?
तू गेल्यापासून माझी
पार गेलीय कमर मोडून...!!
तुझ्या मायेची सावली आई
अजूनही होती हवी
तुझ्यासाठीच मी गं
खरेदी केली साडी नवी....!!
त्या साडीला आजही आई
ठेवले गं काळजाच्या कुपीत
असं कसं नशिब देवा माझं
का माझं जीवनच शापित.....!!
पोरकी झाले आज मी गं
तुझ्या मायेच्या ममतेला
आईविना अर्थ आहे का जगी
का नेलास देवा तू माझ्या मातेला...!!
तुझ्या विना आई मजला
एक क्षण ही करमत नाही
आईच्या मातृत्वाला भुकेली मी
शोधण्या तुजला नजर फिरे दिशादाही...!!
तुझ्यासारखी दिसली बाई
मन माझं आतूर होई
कितु उपकार तुझे आई
सांग कसं होवू उत्तराई....!!
