तु.......❤
तु.......❤
तु असताना हे जग मला वेगळं दिसत..
तु असताना नको कोणी असं वाटतं..
तु बोलताना जगातली सगळ्यात भारी व्यक्ति माझ्याशी बोलते असं वाटतं..
तु बोलताना तुच Friend, तुच Philosopher असं वाटतं..
तु नसताना उगाच चुकल्यासारखं वाटतं..
तु नसताना तु भेटशील तिथं जावं असं वाटतं..
तु दिसताना हे जग खुप सुंदर दिसतं..
तु दिसताना लई भारी वाटतं..
तु असताना सोबत जाऊया दुरच्या जगात असं वाटतं..
तु असताना हे जग घ्यावं निरखून असं वाटतं..
तु बोलताना नजरेत तुझ्या स्वतःला जपायला हवं असं वाटतं..
तु बोलताना मी नको रागवायला तुझ्यावर असं वाटतं..
तु नसताना हे जग सारं थांबलं असं वाटतं..
तु नसताना काय करू असं वाटतं..
तु दिसताना माझ्या मनगटात ताकद आहे असं वाटतं..
तु दिसताना कुठेतरी थांबायला हवं असं वाटतं..
पण तु नसशीलच तेव्हा..

