तु मी फिरतांना!
तु मी फिरतांना!
असावे तुझही माझे,
आकाश निळेसावळे,
दिसताक्षणी हिंडावे,
जसे बहरून यावे तारे,
तु मी फिरताना!
विहंगम दृष्य बघता,
नटखट बोलणे,
जाणून घेत आहे,
जसे माहितीच्या अधिकाराने,
तु मी फिरताना!
वयात आता माझ्या,
रक्त सळसळत आहे,
न्याय मागताना,
मोर्चात उभा आहे,
तु मी फिरताना!
वेध जीवनाचे,
कसे मिळवावे,
कास धरता वळणावर,
रस्ता भटकून जावे,
तू मी फिरताना!
नात्यांची ही नाती,
कसतरी समजून यावे,
नेत्यांच्या या लबाडात,
सावरता पाय कधी घ्यावे?,
तू मी फिरताना!
सांगातरी हे,
सांगणे कुणाचे,
या भूलभुलैया जगात,
ऐकू तरी कुणाचे?,
तू मी फिरताना!
