तु लढावे लढावे...
तु लढावे लढावे...
भयभीत न व्हावे
तु नभाला भिडावे
तु विजेता उद्याचा
तु लढावे लढावे
यश पुढ्यात दिसता
ना हुरळुन जावे,
निधड्या छातीने तु
यशाचे शिखर गाठावे
भितीला मातीत गाडावे
नशीब खुंटीला टांगावे
तुझ्या प्रयत्नांच्या पुढे
नियतीला झुकवावे
काटेकुटे वाटेवर तुझ्या
संकटे घालतील घाव
एका एका घावाला
तु प्रत्युतर द्यावे
तु लढावे लढावे
तु नभाला भिडावे.
