टवाळकी
टवाळकी
टवाळकी त्याने सुरू केली
सज्ज ती त्याला सामोरी झाली...
एक पाऊल त्याने पुढे टाकले
दोन पावले तीने पुढे टाकले...
आत्मविश्वास तीचा पाहता
एक पाऊल त्याने मागे टाकले...
रुद्र रूप तीचे पाहता
मागच्या मागे तो पळत सुटला...
तीने ही
आश्चर्याने स्वतःला न्याहाळले...
असेच नेहमी कोणी वाटेला आले
तर रौद्ररूप धारण करणे...
बजावले स्वतःलाच मनोमनी
टवाळकी करण्याला थोपवावे...!!!