टाक पाऊल पुढे
टाक पाऊल पुढे
का गं उभी अशी दारात
विचारांचे काहूर उठले मनात
फिरु नकोस मागे, टाक पाऊल पुढे
उद्याचे स्वप्न घेऊन उरात ।
सारे क्षितिज तुला मोकळे
उंच झेप घे ना गगनात
अंतरी जिद्द, धैर्य ठेवून
ये ...तिमिरातुनी प्रकाशात ।
सावित्रीच्या लेकींना, कळ्यांना
जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा
मातीमधला वतन वारसा
आकाशावर चितारण्याचा ।
थांबू नको, चालत रहा
विझू नको, तेवत रहा
दिव्यासम उजळत रहा
सरीतासम खळाळत रहा ।
