कविता
कविता
1 min
212
कवितेतून
निसर्ग साकारे
लेखणी आकारे
भावनेतून...............१
लिहू कविता
सर्वांना आनंद
मिळावा स्वानंद
शब्द सरिता ..............२
रचले काव्य
अंतरीचा भाव
प्रतिभेचा गाव
जाहले श्राव्य ..............३
कवितेसाठी
सामाजिक भान
विषयाचे ज्ञान
शारदा पाठी ................४
दैवी देणगी
अक्षरांचा खेळ
बसवावा मेळ
भरे कणगी .................५
साहित्य चौर्य
फार मोठा गुन्हा
सांगे पुन्हा पुन्हा
नाहीच शौर्य ................६
