भक्ती
भक्ती
1 min
355
भक्ती संगे शक्ती
शक्ती संगे युक्ती
त्रयींची होता युती
असाध्य ते साध्य होती ||१||
जिजाऊंनी दिले संस्कार
शिवबाने केले अंगिकार
आई भवानी च्या भक्तीने
गडकिल्ले सर केले युक्तीने ||२||
विश्र्वास आणि श्रद्धा
हाच भक्ती चा पाया
साधा भोळा भाव..
जाईल ना कधी वाया ||३||
भजन कीर्तनात होऊन दंग
देहभान विसरून व्हावे बेधुंद
रामनामाची शक्ती अपरंपार
भवसागर लीलया होईल तडीपार ||४||