दिवाळी
दिवाळी
1 min
539
दिवाळी आली
घर सजवले
कंदिल लावले
खरेदी झाली ............१
आहे दिवाळी
सण पणत्यांचा
उत्सव नात्यांचा
भाऊ ओवाळी .............२
दिवाळी छान
फराळ वाटावे
नेहमी असावे
समाज भान ...............३
करू मदत
गोरगरिबांना
आनंद सर्वांना
देऊ सतत .................४
ऐकावी गाणी
दिवाळी पहाट
प्रकाशाचा थाट
मधुर वाणी ................५
मोद क्षणाचा
आतिषबाजीचा
नी फुलबाजीचा
व्यय धनाचा .................६
