तशी तु......आई
तशी तु......आई
हे जग तर दाखवलंच तु मला
पण सोबत खूप काही दिलंस तु,
माझ्या शब्दाविना ही माझ मन वाचलस तु
तु माझा अबोला ही ओळखलास
हसणाऱ्या चेहऱ्यामागचे अश्रु
फक्त तुलाच दिसले,
निःस्वार्थी तुझ्या प्रेमाने आज मला
पुन्हा एकदा स्थिरावले
अखंड मायेच्या झऱ्यासोबतच
मला मैत्रीचा गोडवा चाखावलास,
तप्त धगधगत्या उन्हातही तुझ्या
शीतल पाडछायेआड ठेवलस
अनेकानेक संस्कारांनी माझी तु
लहानाची मोठी मुर्ती घडवलीस,
माझ्या प्रत्येक चुकांवर तुच तर
बलिशपणाची फुंकर घातलीस
केंव्हाच न रागावणारी सद्भाव
अशी सोज्वळ माऊली तु,
फक्त माझ्यासाठी आज
रणांगणात उतरलीस
