मैत्री
मैत्री
नकळत, न बघत न बोलत झालेली मैत्री
मनाला मनानेच ओळखते,
दुःखाला शब्दाने सारवते तर सुखात एखाद्या नाजुक हर्षाने जीवन सजवते.
संकटात स्वतःहून हाथ पुढे आणते,
वाईट मार्गावर असता आपण सत्याचा मार्ग दाखवते.
यशाच्या मार्गावरील काटे ती हातानेच सारते,
तीच ती मैत्री प्रत्येक गोष्ट न सांगताही जाणते.
तिलाच मी माझी अशी जवळची व्यक्ती म्हणते,
माझी सखी मी मानते.
