निसर्ग
निसर्ग
आज निसर्ग वेगळाच दिसतोय बहूतेक तो आज लाजून हसतोय,
थंडगार वारा आज डोंगराला स्पर्शुन वाहतोय वर ढगांचा गडगडाट जणु जमिनीशी गप्पाच मारतोय.
आज ही झाडं- झुडुपं खुपच बहरलिये पावसाच्या थेंबांनी तर मातीवर रांगोळी काढलीये,
प्रकृती मनसोक्त हसतेय थोडीशी लाजतेय
व्यस्त या शहरात ती आज मायेची फुंकर घालतेय.
आज खुप दिवसांनी हा निसर्ग वेगळा भासतोय
स्वतःच्या रंगात तो जणू रंगलेला दिसतोय,
गडद काळे ढग जमिनीला मिठीत घेऊ बघताय
प्रेमाच्या संवादात मात्र सौदामिण्या रमताय.
आज ही सृष्टी सर्वांनाच रोमांचित करतीये
पक्षांचा किलबिलाट जणु काही ते प्रेमाची कबुली देताय,
पावसाच्या सरींमुळे मातीतून सुगंध दरवळतोय
धरतीकडे पाहून नभ नक्कीच काहितरी खुणावतय.
गोठ्यातल्या गायी हांबरून साद तृनाला घालताय,
वासराच्या मुखाचा आनंद सांगतोय
तो थंडगार वाऱ्याला भुललाय.

