साथ तुझा
साथ तुझा
अंधारलेल्या खोलीत मी एकटी न घाबरता राहते.
रोज पडणाऱ्या कोड्यांना नेहमीप्रमाणेच सोडवते,
कारण तुझ्या असण्याने मी स्वतःला सुरक्षित मानते.
मध्येच केव्हातरी मी खुप काही बोलून जाते,
रागाच्या या सागरात तुलाही वाहुन नेते.
मला साथ तुझा आहे म्हणून खूप आधार वाटतो,
तुझ्या या अबोलाचा खरंच खुप त्रास होतो.

