STORYMIRROR

Mangesh Medhi

Tragedy

3  

Mangesh Medhi

Tragedy

तृष्णा

तृष्णा

1 min
224

साधन जाहले साध्य

जीवन होतसे स्पर्धा

चलन चालवे दौड

पळणे संपता संपेना


झापड दृष्टीस त्याचीच

खोल खोल पतन

मोह हव्यास हावी

संतोष मनी वसेना


कितीही मिळवले

संचय केला कितिक

तरीही व्यय हेच सत्य

चंचल ते चलन जाण


व्यवहार ! भाग मात्र

नसे जीवन ध्येय

गरजे पुरते घेणे

अन तसेच देणे


स्वार्थ लालसा लोभ

अतिरेक विनाश

मोहास नसे अंत

पाताल पतन थेट


मन संतोष सुख

हि तृष्णा अतृप्त


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy