STORYMIRROR

Sunita Ghule

Romance

3  

Sunita Ghule

Romance

तराणे

तराणे

1 min
535


प्रीत ह्रदयी बहरूनिया आली

कळी अबोलीची हळूच फुलली।


छंद लागला साजनाच्या भेटीचा

नयनात झुला स्वप्न तारकांचा।


चांदण्यांशी गुजगोष्टी एकांताला

आळविते अंतरीच्या मोहनाला।


भान उरले ना श्वास भारावला

आठवांत सख्या धुंद मोहरला।


क्षण मिलनाचा वाटतो हवासा

कोंब अंकुरला प्रीतीचा नवासा।


सुख सौख्याचे छेडीते मी तराणे

सोबतीने गाऊ संसाराचे गाणे।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance