STORYMIRROR

Sunita Vaidya

Classics Others

3  

Sunita Vaidya

Classics Others

तप्त उन्हाच्या झळा

तप्त उन्हाच्या झळा

1 min
295

आला वैशाखाचा महिना

सुरू झाल्या उन्हाच्या झळा

चला पिऊया थंड पाणी

कोरडा पडलाय गळा


रणरणत्या या उन्हात

पळस पांगारा फुलला

लाल केशरी रंगाने या

गुलमोहर बहरला


अंगणी फुलला मोगरा

गंध त्याचा दरवळला

राजा जो सगळ्या फळांचा

चहूबाजुंनी मोहरला


तरी,

तप्त उन्हाळ्याच्या या झळा

करी तगमग जीवाची

नको नको वाटे उन्हाळा

वाट पावसाच्या येण्याची


पर्यावरण संवर्धन

मंत्र हा जपुया एकची

झाडे लावू झाडे जगवू

असेल पूजा निसर्गाची...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics