STORYMIRROR

Sunita Vaidya

Others

3  

Sunita Vaidya

Others

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
140

आली नारळी पूनव

अन् रक्षाबंधनाचा सण

भावा-बहिणींच्या नात्यांचा

आनंदी मंगलमय क्षण


भाऊ माझा पाठीराखा

लाभो त्यास आयुष्य उदंड

रेशमाचे हे ऋणानुबंध 

राहो नित्य निरंतर अखंड...


धागा हा मायेचा नि प्रेमाचा

बांधते मी तुझ्याच हाती

हसणे, रुसणे सोबतीने

ही तर आहेत अंतरीची नाती


अतूट असे नाते जन्माचे

भाऊ उभा सदा पाठी

राखीच्या या सणाला

होती भावंडांच्या भेटीगाठी


भावंडांच्या स्नेह-भेटीने

बळ मिळे कुटुंब संस्थेला

हेच नित्य सांगत असते

भारतीय संस्कृती आम्हाला


Rate this content
Log in