STORYMIRROR

Sunita Vaidya

Others

2  

Sunita Vaidya

Others

पैंजण

पैंजण

1 min
59

नाजूक अशा पावलांवर

चढवला पैंजणांचा साज

पण काय लिहावे त्यावर

सुचेनाच काही आज


चालताना छुम छुम वाजे

लहानपणी गंमत वाटे

शाळेत खेळताना मात्र

त्याची अडचणच वाटे


लग्न सोहळ्यात वधूच्या

सोळा शृंगारात दिला मान

मेंदीच्या गोऱ्या पावलांवर 

शोभून दिसतात ते छान


पण

इकडे तिकडे फिरताना

नंतर होऊ लागला त्रास

काढुन ठेवले बाजूला ते

नि मग मोकळा झाला श्वास



साहित्याला गुण द्या
लॉग इन