STORYMIRROR

Sunita Vaidya

Others

2  

Sunita Vaidya

Others

फुलपाखरू

फुलपाखरू

1 min
93

आखीव रेखीव जीवनात

आनंदाची आली ती लहर

छोटेसे एक फुलपाखरू

अलगद बसले हातावर


पंख हलवित हळुवार

सांगे उघड मनाचे दार

रंग त्याचा केशर पिवळा

उत्साहाला देतो तो बहार


मखमली पंखांच्या स्पर्शाने

मोहोळ आठवणींचे उठले

पंख त्याने हळू हलविता

मलाच मी विसरून गेले


त्याच नादात मन माझे

गाणे गुणगुणत राहिले

मजेत आणि गमतीत मी

त्याच्यासवे घरात फिरले


Rate this content
Log in