STORYMIRROR

Sunita Vaidya

Others

4  

Sunita Vaidya

Others

मायबोली

मायबोली

1 min
372

काना मात्रा अन् वेलांटी

साज चढवता वर्णांना

शोभून दिसे माझी भाषा

रूप सुंदर अक्षरांना


मायबोली माय मराठी

विपुल ते शब्द भांडार

अर्थ सुंदर श्रवणीय नी 

अद्वितीय स्पष्ट उच्चार


ळ-ल, श-ष जरी थोडे कठीण

तरी, लावण्य तिचे खुले 

संत साहित्यिक कवींच्या

रचनेतून अविष्कार फुले


सालंकृत भाषा अद्वितीय

करू सारे तिचा सन्मान

मातृभाषा दिनी, 

मायबोलीचा धरू अभिमान!!



Rate this content
Log in