STORYMIRROR

Sunita Vaidya

Others

3  

Sunita Vaidya

Others

परी, एक नारी...

परी, एक नारी...

1 min
118

देव लोकातून अवतरली एक परी

स्त्री जन्म घेऊन आली घरोघरी

स्वप्न साकारण्यासाठी त्या परीचे 

हातभार लावा ना तुम्ही थोडातरी..


कधी मुलगी नि कधी बहीण 

पत्नी कधी तर कधी सासू

साऱ्या भूमिका ती छान निभावते

ठेवून चेहऱ्यावर गोड हसू


आहेत तिची अनेक रूपे

सगळीच नेहमी मनी भरतात

परिस्थितीशी समरूप होऊन

आयुष्याला ही उभारी देतात


तरीही अगं परी...

तुझी ओळख तर तूच आहेस नि 

स्वतःसाठी रस्ता ही तुझा तूच निवड

प्रकृतीचे दुसरे नाव आहे नारी म्हणून

आनंदाने फुलण्यासाठी तूच काढ सवड...


Rate this content
Log in