मकर संक्रांत
मकर संक्रांत
आला मकर संक्रांत सण
उडवू पतंग सारेजण
सुरू सूर्याचे उत्तरायण
वाढे दिनमान कणकण
देऊ तिळगुळ लाडू, वडी
नि हलवा, गजक, रेवडी
वाढवून नात्यातील गोडी
करू अहंकारावर कडी
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळगुळ घ्या गोड बोला!
