STORYMIRROR

Deore Vaishali

Classics Others

3  

Deore Vaishali

Classics Others

तो आणि ती...

तो आणि ती...

1 min
323

सप्तपदी चालल्यावर

ती होते त्याची.....मग ती तीची उरत नाही.


स्वप्न कावेत असतात फक्त,

त्याची साथ देताना.....मग तिलाच वेळ मिळत नाही.


त्यांचे मन जपतांना,

तिच्या भावना संपतात...मग तिचं मन तिचच उरत नाही.


तन, मन, श्वास मिसळतात ,

त्याच्यात,....मग त्यावरही तिचा हक्क उरत नाही.


पण तिच्या अस्तित्वाची

 किंमत तोच,...त्याची सोबत नसले तर तीला अर्थ उरत नाही.


तोही असेल परिपूर्ण,

तीच्या सोबतीला जोड नाही...ती नसेल तर तोही पुर्ण नाही.


एकमेकांच्या आधारानेच तर,

संसाराला शोभा आहे.....तो काय ती काय संसारात दोघेही एकमेकांसाठी अनमोल आहेत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics