STORYMIRROR

Nalini Laware

Classics Others Children

4.0  

Nalini Laware

Classics Others Children

तीर्थक्षेत्र

तीर्थक्षेत्र

1 min
290

 देवबाप्पा देवबाप्पा नवसाला पाव

 साड्यांचे झाड माझ्या अंगणात लाव

 झाडाला येऊ दे छान छान साड्या

 रोज रोज देईन आईला नव्याने घड्या

 मधून मधून खाईन पैठणी उगाच भाव

    झाडाला येऊ दे सोन्याचे तुरे

    शेंगांच्या पैजणला माणिक मोती हीरे

    पानांच्या नेकलेसला पाचूच लाव


 लिपस्टिकच्या कळ्यां नी टिकल्यांची फुले

 रंगीत पर्स जशी हातात हाले

 मॉडेल दिसेल आई माझी काय म्हणता राव.

    माहित आहे मला तिला नको माणिक मोती

    डोळ्यातले पाणी पुसताना लवतात पाती

    कळतोय मला आता तिच्या डोळ्यांतला भाव


 फाटलेल्या साडीत आईला बघवत नाही

 रडून डोळे सुजले तुला किव येत नाही

 लंकेची पार्वती दिलय तिला नाव.

     म्हणून म्हणतो देवा ऐक माझा एकदा

     आईला आयुष्यात सुखी ठेव सदा

     नावापुढे माझ्या कायम असेल तिचे नाव

 फक्त एकदाच ऐक नाही करणार हट्ट

माझ्यासाठी माझी आईच सर्व तीर्थक्षेत्र

 नाही मागणार कधी काही आता तरी पाव


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics