STORYMIRROR

Sarika Jinturkar

Classics Others

3  

Sarika Jinturkar

Classics Others

ती..

ती..

1 min
22

 माहेरचा उंबरठा ओलांडून सहज निघून जाते ती 

सासरचा उंबरठा ओलांडतांना का बर घाबरते ती...


 सगळ्यांचे सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवते ती

 दाराच्या चौकटीत सतत का बर अडकते ती.. 


घरात कशी बघा अगदी मुक्तपणे वावरते ती 

चौकटीची बंधन मात्र स्वतःलाच का बर घालते ती.. 


बाहेर पडली तरी मात्र घराकडे ओढली जाते ती

 दोन्ही सांभाळून अस्थीर तरी का बर राहते ती..  


सगळ्यांच सगळच कायम 

विना तक्रारच करते ती सर्वगुणसंपन्न आहे 

तरी सांगा बर कुठे कमी पडते ती..


तिने ठरवल तर सगळ एकटीच करू शकते ती 

तरी उंबरठ्यात उभी प्रश्नांची उत्तर 

का बर शोधते ती..



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics