ती सायंकाळची हूरहूर
ती सायंकाळची हूरहूर


तू असता बरोबर मनात उठत नाही काहूर
नाही मनी वाटत त्या एकट्या सायंकाळची हूरहूर
तू कवटाळून असते कायम जगाला
अन्
तू नेहमी आपल्या स्वतःच्या विचारात
गुंतलेली...
आठवले का तुला ते दिवस
आपण सोबत एकत्र बसून
सायंकाळी एकत्र कधीतरी आपण
अर्धा कप तो चहा प्यायचो
काय दिवस असायचे ते
काय रात्र असायची ती
कशाची न वाटे भीती
तो एकत्र घेतलेला चहा अधिक गोड
ती सायंकाळची हूरहूर
अजूनही लक्षात आहे ती
सायंकाळची हूरहूर...