STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

तिच्या न बऱ्या होणाऱ्या जखमा

तिच्या न बऱ्या होणाऱ्या जखमा

1 min
114


रोज सकाळी कामावर 

गेलेला तिचा नवरा 

संध्याकाळी दारु पिऊन यायचा

उरलेले पैसे प्रामाणिकपणे

तिच्या हातात ठेवायचा 

तो नशेत असतानाही

 ती त्याच्या सोबत 

जेवायला बसायची

शहाणपण शिकवताना

त्याच्या हातचा मार खायची


 रोज होणाऱ्या 

अत्याच्याराची तिला 

सवय झाली होती

आरडाओरडा न करता

सारकाही सहन करत होती

तो मध्यरात्री उठून 

तिच्या न बऱ्या होणाऱ्या जखमांवर

मलम लावायचा

अंगावर पांघरूण 

टाकताना

तिच्या डोक्यावरून हात 

फिरवायचा


मार खाऊन सुद्धा ती  

त्याला डबा बनवून द्यायची

त्याचा निरोप घेताना

लवकर येण्याच आवर्जून

सांगायची

तो तिच गोडं हसु पाहूनचं

घराबाहेर पडायचा

त्याने मागेवळून 

पाहिल्यावरच तिचा

घरात प्रवेश व्हायचा


तो पुन्हा झिंगत झांगत

घरी आल्यावर

त्या दोघांमध्ये भांडण व्हायची

त्याचा तोल गेल्यावर 

ती त्याला सांभाळून घ्यायची

तो तिच्या कुशीत झोपताना

ती त्याचे पाय दाबून

द्यायची


असे कितीतरी 

वेदनादायी व्रण

तिच्या अंगावर होती

त्याने मलम लावल्याशिवाय

बरी होत नव्हती

रोज भांडण करूनही 

ते एकमेकांची काळजी घ्यायचे

अश्रु पुसताना 

डोळेभरून पहायचे


जगणे त्यांचे

 कसेही असले तरी 

कोणी कुणालाही

अंतर देत नव्हते

एकमेकांसाठी जगताना 

एकमेकांवर 

खूप प्रेम होते



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational